आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्करवरील कारवाईचे पडसाद:ही अघोषित आणीबाणी नाही का? माध्यम स्वातंत्र्याची हत्या नाही का? भास्कर समूहावरील कारवाईनंतर राष्ट्रवादीचा संतप्त सवाल

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताला आणि भारतीयांना या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत म्हणत नवाब मलिकांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

दैनिक भास्कर समूहावर गुरुवारी आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले आहे. यानंतर महाराष्ट्रासोबतच दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या राज्यांतील भास्करच्या कार्यालयांची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईनंतर देशभरातून मोदी सरकारवर टीका केली जात आहे. आता दैनिक भास्कर समूहावर करण्यात आलेल्या या कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही निषेध करण्यात आला आहे. ही अघोषित आणीबाणी नाही का? ही माध्यम स्वातंत्र्याची हत्या नाही का? असे सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी केंद्र सरकारला केले आहेत.

नवाब मलिकांनी ट्विट करत केंद्र सरकारला सवाल केले आहेत. 'जेव्हापासून पेगाससच्या माध्यमातून हेरगिरी केली असल्याचे उघड झाले आहे. तेव्हापासून केंद्र सरकार त्यांना हे त्यांचे सत्य समोर आणणाऱ्यांना लक्ष्य करत आहे. याचा ताजा बळी दैनिक भास्कर ठरले आहे. भास्कर समूहाने पत्रकारितेच्या माध्यमातून निडरपणे उत्तर प्रदेश आणि योगी आदित्यनाथ सरकारचे अपयश समोर आणले आहे.'

पुढे बोलताना मलिक म्हणाले की, 'सरकारकडून माध्यम समूहांचा आवाज दाबून सत्य लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्यावर आयकर विभागाच्या माध्यमातून छापेमारी केली गेली. एवढेच नाही तर तर भारत समाचार वृत्तवाहिनीवर आणि त्यांच्या संपादकावरही छापेमारी केली गेली. ज्यांनी छापेमारी केल्याकडे लक्ष वेधले त्यांच्यावरही छापे टाकण्यात आले आहे.'

नवाब मलिकांनी केंद्र सरकारला केले हे संतप्त सवाल

  1. ही अघोषित आणीबाणी नाही का?
  2. ही माध्यम स्वातंत्र्याची हत्या नाही का?
  3. हे लोकशाहीचे मृ्त्यू वॉरंट नाही का?

भारताला आणि भारतीयांना या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत म्हणत नवाब मलिकांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

बातम्या आणखी आहेत...