आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावयाच्या जामीनावर मलिक:NCB ला गांजा सापडलेला नाही, त्यांना गांजा आणि तंबाखूतला फरक कळू नये? नवाब मलिकांची टीका; तर मलिकांच्या जावयाच्या जामीनाविरुद्ध NCB हायकोर्टात

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हर्बल तंबाखू सापडल्यानंतरही लोकांना फ्रेम करण्यात येतेय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा जावई समीर खान यांना आज अमली पदार्थांच्या प्रकरणात जामिन मिळाला आहे. खान यांना सेलिब्रिटी मॅनेजर राहिल फर्निचरवाला आणि ब्रिटीश नागरिक करण सेजनानी यांच्यासह ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. यानंतर आता नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत जावई समीर खान याच्या अटकेसंदर्भात एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच एनसीबीने समीर खान यांचा जामिन रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

याविषयी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, 'कोर्ट ऑर्डरमध्ये म्हटले आहे की एनसीबीच्या छाप्यामध्ये 200 किलोचा गांजा सापडलेला नाही. केवळ शाहिस्ता फर्निचरवालाकडे 7.5 ग्राम गांजा सापडला आहे. इतर सर्व हर्बल टोबॅको आहे असल्याचे देखीर रिपोर्टमध्ये समोर आले आहे. मग प्रश्न हा उपस्थित होतो की एवढ्या मोठ्या एनसीबीसारख्या एजन्सीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्यकारक आहे. अशा संस्थांकडे इन्स्टंट लेव्हलला टेस्ट करण्याचे किट्स असतात. गांजा नसतानाही लोकांना फ्रेम करण्यात आले आहे. असे मी सांगत नाही तर कोर्टच्या ऑर्डर असे सांगत आहेत.' असे म्हणत मलिकांनी एनसीबीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

पुढे बोलताना मलिक म्हणाले की, '27 अ हे कलम लागू होत नाही. जो काही खटला फर्निचरवाल्यावर लागतो. मात्र त्याला लगेच जामीन देण्यात आला. हर्बल तंबाखू सापडल्यानंतरही लोकांना फ्रेम करण्यात येतेय. सिलेक्टिव्ह खबर लिक करून लोकांची बदनामी करण्याचे काम एनसीबी करत आहे. एनसीबी फर्जिवाडा करत आहे, असंही मलिक म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...