आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांच्या सूचना:'आपल्याला शिवसेनेसोबत कायमच राहायचं आहे, स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या'; अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईत झालेल्या बैठकीत लोकसभा आणि विधानसभेतील पराभूत उमेदवारांना बोलवण्यात आले

'आपल्याला शिवसेनेबरोबर कायमच राहायचं आहे, त्यामुळे शिवसेनेसोबत स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या', असे आदेश राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. महाविकास आघाडीतील काही नेते ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे सांगत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांना या सूचना दिल्या आहेत.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे मंत्री आणि वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमदेवारांनाच या बैठकीला बोलावण्यात आले होते.

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, 'आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचं आहे. महाविकास आघाडी‌ झाल्यानंतर स्थनिक पातळीवर खटके उडत आहे, पण आपल्याला सेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या,' अशा सूचना अजित‌ पवारांनी आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांना दिल्या.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांना खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कानमंत्र देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच ही बैठक बोलवण्यात आली आहे. मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे ही बैठक होत आहे. पराभूत उमदेवारांना मिळालेली मते, त्यांची मतदारसंघातील ताकत, मतदारसंघात कमी मतदान मिळालेल्या भागातील पक्षाची स्थिती, या उमेदवारांच्या पराभवाची कारणे आणि त्यावरील उपाय याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...