आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा या मागणीसाठी NCP कार्यालयाबाहेर एका कार्यकर्त्याने रॉकेल अंगावर ओतत आत्मदहनाचा प्रयत्न केला. इतर कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला आहे. कार्यालयाबाहेर हजारो कार्यकर्त्यांचा जमाव असल्याने शरद पवारांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा निवड समितीने फेटाळला आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू होती.
नक्की काय झाले?
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी 15 सदस्यीय बैठक सुरू असताना कार्यालयाबाहेर आंदोलन करताना एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी एकच गोंधळ उडाला. आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनी त्याला रोकण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांचा मोठा जमाव NCP कार्यालयाबाहेर जमला होता. यावेळी काही कार्यकर्ते समितीच्या बैठकीच्या ठिकाणी घुसले. यातील एका कार्यकर्त्याचा बीपी लो झाल्याने गोंधळ उडाला होता. कार्यकर्ते राजीनामा मागे घेण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत.
पोलिस बंदोबस्त वाढला
कार्यकर्त्यांचा आक्रोश वाढत असतानाच शरद पवार NCP कार्यालयात येणार आहेत. आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे तसेच कार्यकर्त्यांच्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर सिल्वर ओकवरील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
"आम्ही तीन दिवसांपासून पवार साहेबांना राजीनामा परत घेण्यासाठी विनंती करत आहोत. पवारांनी राजीनामा वापस घेतला नाही तर आम्ही जीव देऊ" असे एक कार्यकर्ता म्हणाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.