आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NCP मधल्या घडामोडी:राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील यांचा राजीनामा; शरद पवारांना निर्णय मागे घेण्याचे आवाहन

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद आणि आमदार अनिल पाटील यांनी राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. धाराशिव आणि बुलढाण्याच्या जिल्हाध्यक्षांनी कालच राजीनामे पाठवले होते. मात्र, हे राजीनामे स्वीकारणार नाही, असे सांगण्यात आले होते. मात्र, तरीही कार्यकर्त्यांची नाराजी काही केल्या कमी होताना दिसत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रतोद अनिल पाटील यांनी यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी आज शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्याकडे आमदारकीच्या राजीनाम्याचे पत्र दिले. पाटील प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, शरद पवारांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडले. त्यामुळे मी राजीनाम्याचा निर्णय घेतला. आमचे राजकीय अस्तित्व त्यांच्यामुळे आहे. माझ्यासह इतर आमदारांनी राजीनामा दिला आहे. प्रतिकात्मकरित्या मी राजीनामा दिला आहे.

शरद पवारांनी आपल्या निर्णय मागे घेतला नाही, तर आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे सकाळी जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत ठाण्यातल्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या राजीनाम्याची पत्रे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईत बैठक असल्याचे प्रसारमाध्यमांनी सांगितले. मात्र, सुप्रियाताई सुळे यांच्याशी बोलणे झाले. तेव्हा मुंबईत कसलिही बैठक झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. आता सायंकाळी बैठक आहे. मी तिकडे जाणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. या बैठकीत शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत आणि पदाधिकाऱ्यांच्या राजीनामासत्रावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

संबंधित वृत्तः

भाकरी फिरवणार:राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून शरद पवार निवृत्त; स्वत: केली घोषणा, यापुढे निवडणूकही लढवणार नाही

82 वर्षांच्या शरद पवारांनी NCP चे अध्यक्षपद सोडले, कार्यकर्ते नाराज; अजितदादा म्हणाले - फेरविचारासाठी साहेबांनी मागितला वेळ

लोक माझे सांगाती:अजितचा पहाटेचा शपथविधी माझ्या सहमतीविना; शरद पवारांनी पुस्तकातून सोडले मौन