आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:आमच्या सर्कशीत प्राणी आहेत, विदूषक हवाय : पवारांचा राजनाथसिंहांना टोला

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेते गेले तरी कार्यकर्त्यांच्या जिवावर राष्ट्रवादी तगून राहिली आहे - पवार

महाराष्ट्रातले सरकार जर ‘सर्कस’ असेल तर त्यांना आता एका विदूषकाची गरज आहे, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना लगावला आहे. राष्ट्रवादीच्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला पवारांनी ‘फेसबुक लाइव्ह’ वरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

राजनाथसिंह यांनी व्हर्च्युअल रॅलीद्वारे राज्यातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्या वेळी महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख ‘सर्कस’ म्हणून केला होता. यासंदर्भात पवारांना छेडले असता त्यांनी ‘आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत, पण विदूषकाची मात्र कमतरता आहे,’ या शब्दांत समाचार घेतला. १० जून हा राष्ट्रवादीचा स्थापना दिन आहे. या निमित्ताने बोलताना पवार म्हणाले की, पक्ष दोन दशकं वेगवेगळ्या टप्प्यातून गेला आहे. सत्ता नसताना आणि सत्ता असताना पण पक्ष कधीही संपलेला नाही. काहींनी पक्ष संपेल अशी भाकितं वर्तवली होती पण तसे झाले नाही. पक्षाने भरभरून दिले तरीही अनेक नेत्यांनी स्वार्थासाठी, आणि सत्तेसाठी पक्ष सोडला. पण नेते गेले तरी कार्यकर्त्यांच्या जिवावर राष्ट्रवादी तगून राहिली आहे.

   

बातम्या आणखी आहेत...