आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवारांची मुलाखत:मी पुन्हा येईन हा आता चेष्टेचा विषय, शिवसेना नसती तर भाजपचे केवळ 40-50 आमदारच आले असते, शरद पवारांचे रोखठोक भाष्य 

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेमध्ये कधीच सहभागी नव्हते, त्यांना कोणतीही माहिती नाही - शरद पवार

शिवसेना खासदार संजय राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीचा पहिला भाग आज शिवसेना मुखपत्र सामनामध्ये प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये शरद पवारांनी अनेक प्रश्नांची उत्तर देत रोखठोक भाष्य केलं आहे. यामध्ये त्यांनी भाजपवर तसेच देवेंद्र फडणवीसांना चांगलेच टोले लगावला आहे. मी पुन्हा येईल हा आता चेष्टेचा विषय झाला असल्याचा चिमटा देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. तर शिवसेना नसती तर भाजपचे केवळ 40-50 आमदारच निवडून आले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

शरद पवार या मुलाखतीमध्ये म्हणाले की, 'शिवसेना नसती तर भाजपचे 40-50 आमदारच निवडणून आले असते. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे 'मी पुन्हा येईन' हे वाक्य खूप चर्चेत होते. याविषयी बोलताना पवार म्हणाले की,'मी पुन्हा येईन' म्हणण्यामध्ये दर्प होता. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हा आता चेष्टेचा विषय झाला. राजकीय नेत्याने जनतेला गृहीत धरु नये. भाजपचे फक्त 'आता आम्हीच' हे लोकांना आवडले नसल्याचेही पवार म्हणाले. 

विधानसभा निवडणुका लढवताना शिवसेना भाजपची युती होती. यावेळी भाजपचे 105 आमदार निवडणून आले होते. यावरुन शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजपचे 105 आमदार जिंकण्यात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. शिवसेनासोबत नसती तर 105 चा आकडा 40-50 वर असता. बाळासाहेबांचा विचार, कामाची पद्धत भाजपशी सुसंगत नसल्याचेही पवार म्हणाले. तसेच बाळासाहेबांची भूमिका आणि भाजपची पद्धत यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बाळासाहेबांनी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजनांचा सन्मान केला. बाळासाहेबांची भाजपसोबतची युती व्यक्तिसापेक्ष असल्याचंही पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेमध्ये कधीच सहभागी नव्हते

यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेबाबत काही दिवसांपूर्वी दावा केला होता. आता या दाव्यावर शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नसल्याचं म्हटलं आहे. तसेच फडणवीसांना याविषयीही कोणतीही माहिती नसल्याचा टोलाही पवारांनी लगावला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser