आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
माजी मंत्री एकनाथ खडसे भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच खान्देश दौऱ्यावर जाणार होते. मात्र सोमवारी हा दौरा अचानक रद्द करण्यात आला. पवारांचा खान्देशमधील हा दौरा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. 15 नोव्हेंबर रोजी त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना जळगावमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याने एकनाथ खडसे यांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यामुळेच शरद पवारांना उत्तर महाराष्ट्राचा दौरा काही दिवसांसाठी रद्द करावा लागला.
एकनाथ खडसेंसोबत भाजपचे शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. यामुळे भाजपला उत्तर महाराष्ट्रात मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची उत्तर महाराष्ट्रात हळूहळू पकड मजबूत होत चालली आहे. अशातच शरद पवार उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार होते. या दौऱ्यातून त्यांची भाजपच्या गडात शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी होती. पण सोमवारी रात्री उशिरा अचानक हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.