आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कायद्याचं बोला:‘भारत बंद’च्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे जुने पत्र व्हायरल; राष्ट्रवादीची गोची

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकरी आंदोलनाला नांदेडमध्ये ट्रॅक्टर रॅली काढून पाठिंबा दर्शवण्यात आला. - Divya Marathi
शेतकरी आंदोलनाला नांदेडमध्ये ट्रॅक्टर रॅली काढून पाठिंबा दर्शवण्यात आला.
  • कृषी कायद्यांबाबत शरद पवारांची दुटप्पी भूमिका; भाजपचा आरोप

‘भारत बंद’च्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यूपीए सरकारमध्ये कृषिमंत्री असताना पाठवलेले बाजार समितीच्या माॅडेल अॅक्टबाबतचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल करून भाजपच्या आयटी सेलने राष्ट्रवादीची चांगलीच कोंडी केली. बाजार समित्या मोडीत काढण्यास व शेतमाल नियमनमुक्तीसाठी पवार प्रयत्नशील होते हे भाजपने दाखवून दिले. यामुळे शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिलेल्या राष्ट्रवादीला सारवासारव करण्यासाठी धावाधाव करावी लागली. दरम्यान, पवार यांचे जुने पत्र सकाळी सोशल मीडियावर व्हायरल होताच सायंकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कृषी कायद्यांबाबत पवार दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला. त्यापाठाेपाठ भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेतली. पवार यांनी तेव्हा व्यापक भूमिकेतून बाजार समितीच्या माॅडेल अॅक्टसाठी राज्यांना सूट दिली होती, अशी सारवासारव प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

१६५ पानांचे पत्र, पण दोनच पाने व्हायरल : मलिक
भाजपकडून पवार साहेबांच्या ज्या पत्राचा उल्लेख करण्यात येत आहे ते पत्र १६५ पानांचे आहे. मात्र जाणीवपूर्वक त्यातील दोनच पाने सोशल मीडियावर टाकली गेली आहेत. पवार यांनी राज्यांना लिहिलेले पत्र हे सूचक होते, ते निर्देश नव्हते. बाजार समितीचे अधिकार केंद्राकडे घेण्यास पवार यांनी कधीही प्रयत्न केला नाही, असा दावा अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केला.

तेव्हा पाठिंबा, आता विरोध का; पवार आणि ठाकरे यांना फडणवीसांचा सवाल
मुंबई | शेतीमालाच्या बाजार व्यवस्थेतील सुधारणेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, अकाली दलासह डाव्या पक्षांनीही यापूर्वी वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. मात्र आता मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना केवळ विरोधासाठी विरोध केला जात असून दिल्लीतील आंदोलनाद्वारे देशात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला. शरद पवार यांनी कृषी कायद्यांना विरोध केलेला नाही. त्यांनी केवळ व्यापक चर्चेची मागणी केली आहे. माझ्या सरकारमध्ये असताना शिवसेनेने कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळे, भाजीपाला नियमनमुक्तीस पाठिंबा दिला होता. मग आताच हे का विरोध करीत आहेत, असा सवाल त्यांनी केला.

फडणवीसांनी वाचून दाखवले पवारांचे पत्र : अकाली दलाच्या हरमनप्रीत कौर यांनी संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या कायद्यातील तरतुदींना पाठिंबा दिला होता. मोदी सरकारला विरोध करण्यासाठी मुद्दा शिल्लक नसल्याने दिल्लीतील आंदोलनाला ते पाठिंबा देत आहेत, असे फडणवीस म्हणाले. या वेळी यांनी केंद्रात कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी बाजार समितीतील बदलांबाबत पाठवलेल्या पत्राचे उतारेच फडणवीसांनी वाचून दाखवले.

भाजपकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न; राष्ट्रवादीचा प्रत्यारोप
लॉकडाऊनमधील अंबानी-अदानींचे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्राने कायदा थोपवला : राजू शेट्टी
पुणे | लॉकडाऊन काळात अंबानी आणि अदानी यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठीच तीन कृषी कायद्यांची निर्मिती करण्यात आली आहे, असा सनसनाटी आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन व मंगळवारच्या भारत बंदला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील कोणत्याही शेतकरी संघटनेने नव्या कृषी कायद्याची मागणी केली नव्हती. परंतु असे असतानाही शेतकऱ्यांवर हा कायदा थोपवला जात आहे,असा आरोप केला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser