आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

चंद्रकांत पाटलांवर निशाणा:मलाही 'मविआ'मध्ये घ्या म्हणत त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सरकार आणि युतीबद्दल वक्तव्य केलं होतं. राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत येण्यास तयार आहोत असे पाटील म्हणाले होते. यानंतर आता शरद पवारांचे नातू आणि कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. मलाही महाविकास आघाडीमध्ये घ्या म्हणत त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं ! असा टोला त्यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी शिवसेनेबाबत मवाळ भूमिका घेतली होती. एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले होते की, राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येण्यास तयार आहोत. मात्र यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे हे विधान खोडले होते. आमच्याकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव नाही, शिवसेनेकडून आम्हाला कोणात प्रस्ताव नाही. यामुळे हा विषय आता आमच्यासमोर नाही. असं फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं.

दरम्यान रोहित पवारांनी नाव न घेता चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट केले की, 'आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं भाजपातील एक मोठे नेते म्हणाले. सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता 5 वर्षात भाजपापासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! आतातरी राजकारण थांबवा!' असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.