आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित पवारांचं खोचक ट्वीट:मोदी साहेब मोठे नेते, पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काम केलं नाही, असं नाही

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल महोदयांचा केवळ 250-350 वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचे वाटायचे पण त्यांचे कालचे वक्तव्य बघता मागील 70 वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. मोदी साहेब हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केले नाही, असे नाही, या शब्दात राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.

पुढे ते म्हणाले की, आज कळस दिसत असेल तर त्याचा भक्कम पाया हा आधीच घातला गेलेला आहे आणि त्यात आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांचा वाटा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. तसेच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचेच योगदान असते असे नाही तर आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरीकांचे योगदान तेवढेच महत्त्वाचे असते. म्हणून 'आधी भारतीयांना किंमत नव्हती' असे वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीने करणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे.

काय म्हणाले भगतसिंह कोश्यारी?
आपण देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांचाही काळ पाहिला आहे. मात्र, पहिल्यांदा देशासाठी वीस तास काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जादूमुळे जगात भारताचा गौरव वाढला आहे. मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती. आमच्या प्रथा,परंपरांना लोक नावे ठेवायची. मात्र, आज मोदींमुळे देशाचा जगात गौरव वाढत आहे. नाहीतर याआधी भारतात काहीच करण्यासारखे नाही; हा गुलामांचा देश आहे, असाच समज होता, अशा शब्दात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगाण केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतकोत्तर महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

  • अनेक वादग्रस्त विधाने

मुंबईबद्दल वक्तव्य
भगतसिंह कोश्यारी यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्यानंतर अनेकवेळा कोश्यारींची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकतेच त्यांनी मुंबई-ठाण्यातील गुजराती आणि राजस्थानी लोकांबद्दल कौतुकाचे उद्गार काढताना मुंबई-ठाण्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. "महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले, तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही", असे ते म्हणाले होते.

शिवाजी महाराजांविषयी...
राज्यपाल कोश्यारी यांनी समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला देत एक वक्तव्य केले होते. "चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? गुरुचे आपल्या समाजात मोठं स्थान असते, तसेच छत्रपतींनी मला माझे राज्य तुमच्या कृपेने मिळाले आहे, असे समर्थांना म्हटले' आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले होते. या राज्याची चावी मी तुम्हाला देतो. त्यावर समर्थ म्हणाले, ही राज्याची चावी मला कुठे देता, तुम्हीच याचे ट्रस्टी आहात", असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.

महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल...
कल्पना करा की सावित्री बाईंचे लग्न 10 वर्षी झालं, तेव्हा त्यांच्या पतीचे वय हे 13 वर्ष होते. कल्पना करा की लडके-लडकीया, मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील. लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील. एक प्रकारे तो कालखंड मुर्तीच्या पुढे फुले वाहण्याच्या, नतमस्तक होण्याइतकाच नव्हे, तर थोडा इतिहासाचा अभ्यास करण्याचा होता. इतिहासातून शिकण्याचीही संधी आहे, असे ते म्हणाले होते. भगतसिंह कोश्यारी यांच्या या वक्तव्यामुळे भाजप मात्र कोंडीत सापडले होते.

नेहरू यांच्याबाबत
अटल बिहारी वाजपेयींचे सरकारचे कौतूक करताना कोश्यारी म्हणाले होते की, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत मला प्रचंड आदर आहे. पण त्यांचीही एक कमकुवत बाजू होती. ते शांतीदूत आहेत असं त्यांना नेहमी वाटायचे. देशासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. पण त्यांच्या शांतीदूत या प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला आणि हे बराच काळ पुढे सुरू होते. अटल बिहारी वाजपेयींचे सरकार वगळता आधीचं सरकार राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गंभीर नव्हते. वाजपेयींनी अणुचाचणी करून भारताची कणखर प्रतिमा जगाला दाखवली. त्यांच्या या वक्तव्यावरुन प्रंचड वाद निर्माण झाला होता.

बातम्या आणखी आहेत...