आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोहित पवारांचा भाजपला सल्ला:'जनतेने मविआची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची 'जागा' दाखवून दिली, आता तरी भाजपने खऱ्या अर्थाने...'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती.

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजप मोठा धक्का बसला आहे. नागपूर, पुणे, औरंगाबाद या मतदारसंघांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजपचे मुख्यालय असणाऱ्या नागपुरातील जागाही भाजपला राखता आलेली नाही. यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच खोचक सल्लाही दिला आहे.

'भाजपचे म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत येथे महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा रोवला. त्यामुळे आतातरी भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात करायला हरकत नाही.' असा सल्ला रोहित पवारांनी भाजपला दिला आहे. 'भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची 'जागा' दाखवून दिली.' असा टोलाही रोहित पवारांनी लगावला आहे.

विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल लागले आहे. यामध्ये महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. रोहित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser