आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''आम्ही शिवसैनिक म्हणून ज्या केसेस घेतल्या त्या आम्हीच घेतल्या. रामदास कदमांनी नव्हे ते भित्रे आहेत त्यांच्यावर एकही केस नाही असा घणाघात ठाकरे गटात प्रवेश करताच माजी आमदार संजय कदम यांनी केला.
या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांचा ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेशही झाला. त्यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनीही ठाकरे गटात आज प्रवेश केला. यावेळी ठाकरेंनी शिवबंधन हाती बांधले. या सभेत बोलताना संजय कदम यांनी रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल केला.
ठाकरे गटात जाण्याच मज्जाव केला होता
संजय कदम म्हणाले, शिवसेना म्हणजे आम्हीच असे गद्दार म्हणत आहेत. त्यातून ते लोकांच्या मनात संम्रभ निर्माण करीत आहेत. पण कोकणात आम्ही दाखवून देत आहोत की, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बांधील आहोत. या तालुक्यात सभा होणार असल्याने रामदास कदम अनेकांना जाण्यास मज्जाव करीत होते. कार्यकर्त्यांना ते चौकशीची भिती दाखवत होते. आमचे बॅनर फाडले गेले.
रामदास कदम भित्रे
संजय कदम म्हणाले, आम्ही शिवसैनिक म्हणून ज्या केसेस घेतल्या त्या आम्ही घेतल्या. रामदास कदम हे भित्रे आहेत त्यांच्यावर एकही केस नाही. नारायण राणेंवर ते आरोप करायचे. आता आम्ही रामदास कदमाला काय म्हणायचे. रामदास कदम कुणाचेच नाहीत. रामदास कदम जेथे राहतात तेथील सर्व पक्षाचे पदाधिकारी ठाकरे गटात आहेत. शिवसेनेचाच नगराध्यक्ष खेडमध्ये बनणार. जिल्हा परिषदही ठाकरेंच्याच शिवसेनेची सत्ता येईल.
आम्ही झोडपून काढू
संजय कदम म्हणाले, भास्कर जाधव आणि मी आम्ही दोघे झोडपून काढू आणि विजय मिळवू. रामदास कदमाला वाटते की, मीच फूटीचे राजकारण केले. मी मुळचा शिवसैनिक माझ्यातील शिवसैनिक जागा झाला. शिवसेना संकटात असताना मी शिवसेनेत आलो. मला कसलीच अपेक्षा नाही.
रामदास कदमांना माफी मागावी लागली
संजय कदम म्हणाले, रामदास कदम आजपर्यंत दुसऱ्यांची घरे फोडत होते. पण आज त्यांची तिच अवस्था होत आहे. त्यांनी उत्तर सभा घेतली पुढे काय झाले? अखंड महाराष्ट्रातील लोकांनी रामदास कदमांवर रोष व्यक्त केला. त्यांना माफी मागावी लागली. रामदास कदमांनी कुटुंब उद्धवस्त करण्याचे काम केले पण शहरात ते जावून सांगतात की, माझ्यावर वाईट वेळेवर आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.