आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक आरोग्य दिनी घेतला दुसरा डोस:शरद पवार यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस, परिचारीकेचे मानले आभार; जनतेला केले लस घेण्याचे आवाहन

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरद पवार यांना नुकताच ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनावरील लसीचा दुसरा डोस घेतला आहे. आपल्या निवासस्थानीच शरद पवार यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, डॉ. तात्याराव लहाने यांची उपस्थिती होती.

यापूर्वी 1 मार्चला शरद पवारांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. याच्या एका महिन्यानंतर त्यांनी आज लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तसेच आज जागतिक आरोग्य दिवस आहे. या निमित्ताने त्यांनी जनतेला लसीकरण करुन घेण्याचे आवाहनही केले आहे.

लस घेण्याचे आवाहन

ते म्हणाले की, 'आज सकाळी कोविड-19 लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. डॉ. लहाने व त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार!' तसेच पुढे ते म्हणाले की, 'योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा.'

नुकताच रुग्णालयातून मिळाला आहे डिस्चार्ज

शरद पवार यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पित्ताशयात खडे झाल्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता ते घरीच विश्रांती घेत आहे. दरम्यान त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करत कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याची माहिती दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...