आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
येत्या 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 22 व्या वर्षात पदार्पण करत आहे. याच निमित्ताने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी 'राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय' या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत राज्यभरातील जवळपास 5 लाख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे.
काय आहे 'राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय' ?'
'राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय' अभियानांतर्गत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी 'महासंवाद' साधणार आहेत. या महासंवादादरम्यान जयंत पाटील हे जवळपास 5 लाख पदाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधतील.
राज्यात महाविकासआघाडी सरकार येऊन जवळपास 6 महिने पूर्ण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकासआघाडी सरकारचा प्रमुख घटक आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते कोरोनाच्या या संकटकाळात तळागाळातील लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचे काम करत आहे. काही दिवसांनी कोरोनाचे संकट संपेल तसेच राज्य पूर्वपदावर येईल त्यानंतर काही समस्या उद्भवतील या समस्यांचे निवारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पुन्हा जोमाने कामाला लागतील. लोकांपर्यंत मदत पोहोचवताना कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी, प्रश्न, मनोगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील 'राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय' या अभियानांतर्गत जाणून घेतील तसेच ते पक्षश्रेष्ठींकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतील.
हा संवाद दुतर्फा असेल असे जयंत पाटील यांनी नमूद केले. 22 मे रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून हे अभियान सुरू केले असे जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षासाठी झटला आहे, पक्षाचे जे काही वैभव आहे ते कार्यकर्त्यांमुळेच आहे. म्हणून त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. कार्यकर्ते आहेत म्हणून पक्ष आहे असे मत जयंत पाटील यांनी मांडले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.