आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युती:‘वंचित’बरोबर आघाडीसाठी राष्ट्रवादीचाही हिरवा कंदील

मुंबई3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समविचारी लोक एकत्र येऊन समोरच्या पक्षाचा पराभव करून मतांची विभागणी होऊ नये म्हणून तयारी करत आहेत. परंतु यासाठी एका बाजूने तयारी चालत नाही तर दोन्ही बाजूंनी तयारी हवी. याअगोदरही आम्ही आठवले, गवई, कवाडे यांच्या पक्षांशी चर्चा केली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांशी आम्ही चर्चा करायला तयार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी (२३ नोव्हेंबर) स्पष्ट केले. तसेच पीक विम्यासंदर्भात केंद्राने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीचे संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीकडून हिरवा कंदील दाखवल्याने महाविकास आघाडीतील वंचितच्या सहभागाच्या आशा बळावल्या आहेत. मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेसने यावर अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही आपली भूमिका असून त्यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. असे असताना आपल्याकडे असणारी गावे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रयत्न निषेधार्ह असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य जनतेला आवडलेले नाही. कर्नाटकाची ही भूमिका आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा पवारांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...