आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • NCP's List Of 40 Star Campaigners For Bihar Elections Announced From Central Office, National President MP Sharad Pawar Chief Campaigner

बिहार निवडणूक:बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची स्टार प्रचारक यादी केंद्रीय कार्यालयातून जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार असणार मुख्य प्रचारक, तर सुप्रिया सुळेंसह 40 जणांची यादीत नावे

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रवादी बिहार निवडणुक लढवणार - महेश तपासे

बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 40 स्टार प्रचारकांची यादी दिल्ली केंद्रीय कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्य स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे असणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस बिहार निवडणुक लढवणार असून याबाबतची माहिती लवकरच राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक जाहीर करतील.

राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, के. के. शर्मा, खासदार सुप्रियाताई सुळे, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राजीव झा, नरेंद्र वर्मा, राजेंद्र जैन, सच्चिदानंद सिंग, ब्रिजमोहन श्रीवास्तव, के. जे. जोसेमन, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दुहान, शब्बीर विद्रोही, पुष्पेंद्र मलिक, सीमा मलिक, विरेंद्र सिंग, गोविंदभाई परमार, वेदपाल चौधरी, उमाशंकर यादव, एस. पी. शर्मा, मुरलीमनोहर पांडे, नवलकिशोर साही, राहत काद्री, जितेंद्र पासवान, ललिता सिंग, संजय केशरी, इस्तियाक आलम, अकबर अली, मनोज जैस्वाल, खुशारो आफ्रीदी, ब्रिजबिहारी मिश्रा, शकील अहमद, अझर आलम, इंदू सिंग, चांदबाबू रहेमान, चंद्रेश कुमार, चंद्रशेखर सिंग आदींचा समावेश आहे.

दरम्यान शिवसेनाही बिहार विधानसभेतून 50 जागांवर निवडणूक लढवणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असले तरीही बिहारमध्ये ते वेगवेगळी निवडणूक लढवणार आहेत. नुकतीच शिवसेनेने आपली 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासोबतच 20 जणांचा समावेश आहे.