आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड निश्चित:राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर, आज घोषणा होण्याची शक्यता, महामंडळांवरील नियुक्त्याही लवकरच

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (जि. पुणे) यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे. याबाबत गुरुवारी घोषणा होण्याची शक्यता आहे.

दीड वर्षांपासून हे पद रिक्त आहे. महिला अत्याचाराच्या घटना राज्यामध्ये वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महामंडळांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. शिवसेना-भाजप युती सरकार काळात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती रद्द करण्यात आल्यानंतर आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. त्यामुळे आता रुपाली चाकणकर यांची महिला अध्यक्षपदी वर्णी लागणार आहे. त्याच प्रमाणे अन्य महामंडळावरील नियुक्त्याही सरकारकडून लवकरच केल्या जाणार असल्याचे समजते.

चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी राज्यभरात राष्ट्रवादीचे महिला संघटन मंजबूत करण्यासाठी मेहनत घेतली आहे. उच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०२० मध्ये आयोगावर अध्यक्षाची नेमणूक करण्याची निर्देश दिले होते. तरी राज्य सरकारने गेले दीड वर्ष हे पद रिक्त ठेवले आहे.

बातम्या आणखी आहेत...