आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:किमान 15 दिवस गतवर्षीप्रमाणे प्रभावी लाॅकडाऊनची गरज, मुंबई उच्च न्यायालयाची सरकारला सूचना

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या लाटेला यशस्वीपणे थोपवण्यासाठी गतवर्षीइतका प्रभावी आणि कडक लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.

गतवर्षीप्रमाणे या वेळीही किमान १५ दिवस नागरिक घरातच राहिले तरच आपल्याला अपेक्षित परिणाम मिळू शकतील त्यामुळे राज्य सरकारला तसा सल्ला द्या, अशी सूचना महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या.जी.एस.कुलकर्णी यांच्या खंडपीठाने केली आहे. एका जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी ही सूचना केली आहे.

रुग्णालये हवीत, लाक्षागृहे नकोत : न्यायालयाने राज्यातील सर्व रुग्णालये,नर्सिंग होम्स आणि कोविड केअर सेंटरचे फायर ऑडिट मनपांकडून करून घ्यावे, असे आदेश राज्य सरकारला दिले. महाभारतामध्ये पांडवांना ठार मारण्यासाठी दुर्योधनाने मेणाचे लाक्षागृह बनवले होते. त्याचा संदर्भ देत रुग्णालये ‘लाक्षागृहे’ बनू नयेत, अशा शब्दांत न्यायालयाने खडसावले आहे.

बातम्या आणखी आहेत...