आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील विहिरींची माहिती सभागृहासमोर ठेवा:डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश, म्हणाल्या-कोण टँकर माफिया आहेत हे समोर येईल!

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील विहिरींची माहिती अद्ययावत करून सध्याच्या घडीला किती विहिरी आहेत. यातील पाणी पिण्यालायक आहे का? यामध्ये असलेले पाणी कोण वापरत आहे, याची माहिती देण्याची सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विधानपरिषदेत केली.

लक्षवेधी प्रश्नांतर्गत विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांनी मुंबई मधील रस्त्यांच्या निधीमधील घोटाळा, वेगाने वाढत चाललेल्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलामुळे बांधकामासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला.

विहिरी नामशेष

दरम्यान या लक्षवेधीतील मुंबईत असणाऱ्या विहिरी नामशेष होत चालल्या बाबतचा मुद्दा दुर्लक्षित झाला होता. त्यामुळे तात्काळ उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तो मुद्दा उदय सामंत यांच्या लक्षात आणून दिला.

परिस्थिती गंभीर

यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, या लक्षवेधी मधील महत्वाचा भाग समोर आलेला नाही. तो म्हणजे मुंबईतील विहिरींच्या संदर्भातील प्रश्न. या लक्षवेधीत 19 हजार विहिरींपैकी अनेक विहीरी नामशेष झाल्याने परिस्थिती गंभीर झाली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मुंबईतील विहिरींची माहिती अद्ययावत करून सध्याच्या घडीला किती विहिरी आहेत. यातील पाणी पिण्यालायक आहे का? यामध्ये असलेले पाणी कोण वापरत आहे, याची माहिती महिनाभरात देण्यात यावी.

त्याचप्रमाणे यातून कोण टँकर माफिया आहेत हे समोर येईल. यावेळी उदय सामंत यांनी माहिती अद्ययावत करून सभागृहासमोर ठेवली जाईल असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...