आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पावसाळी अधिवेशन:विधान परिषद उपसभापतिपदी गोऱ्हे यांची फेरनिवड निश्चित; भाजपच्या वतीने भाई गिरकर यांचा अर्ज, तर निवडणूक होऊ नये म्हणून भाजपची कोर्टात धाव

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विधान परिषदेच्या उपसभापतिपदासाठी आज निवडणूक

विधान परिषदेच्या उपसभापतिपदासाठी मंगळवारी निवडणूक होत आहे. यासाठी “महाविकास आघाडी’तर्फे शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात भाजपचे माजी राज्यमंत्री भाई गिरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. या सभागृहात भाजपचे सर्वाधिक २३ सदस्य असले तरी आघाडीची एकत्र मते ३३ असल्याने सेनेच्या डॉ. गोऱ्हे दुसऱ्यांदा उपसभापती बनू शकतात. परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी रिक्त जागेची निवडणूक सोमवारी जाहीर केली. कोरोनासारख्या परिस्थितीत हा विषय प्राधान्याचा नसल्याचे सांगून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यास विरोध केला.

मात्र ही निवडणूक होऊ नये, यासाठी भाजपने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ही माहिती दिली.

0