आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ना माझे ना तुमचे हिंदुत्व हे एकच':हिंदुत्व हे एकच आणि सनातन; प्रज्ञासिंह ठाकूर यांचे मोठे वक्तव्य

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'ना माझे ना तुमचे हिंदुत्व हे एकच असून ते सनातन आहे, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे. तुमचे आणि माझे हिंदुत्व वेगळे असू शकत नाही असे म्हणत त्यांनी राज्यातील हिंदुत्वांच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या राजकीय वादावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

गेली अनेक दिवस राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले आहे. यातच उद्धव ठाकरेंनी भाजपचे हिंदुत्व मान्य नाही असे म्हटले होते, यावर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या की हिंदुत्वची परिभाषा एकच आहे. ते बदलू शकत नाही, यात तुमचे आमचे असे काही नसून हिंदुत्व हे सनातनी आहे असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

नेमके काय होते प्रकरण?
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर न्यायालयात हजर झाल्या होत्या. न्यायालयीन कामकाज संपल्यानंतर करण्यास सिंग ठाकूर यांनी म्हटले आहे. मालेगाव शहरात बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 6 ठार, तर 90 जण जखमी झाले होते. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात वापरण्यात आलेले मोटर सायकल बाईक साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांची होती, असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात त्यांना अटक देखील करण्यात आली होती. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर जामिनावर बाहेर आहेत.

बातम्या आणखी आहेत...