आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडले जातेय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत हीच इच्छा. अशा आशयाची पोस्ट मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी फेसबुकवर टाकाली आहे.
राज ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून अशा प्रकारे वेठबिगारी करून घेणाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे. नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचे उच्चाटन झाले असले तरी ही प्रथा अस्तित्वात आहे. आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात या घटना आढळणे हे राज्याला शोभणारे नाही.
वेठबिगारी क्रूर प्रथा
राज्यसरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवे. पण हे करताना एकूणच जागृत समाजाने पण पुढे यायला हवे. वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे, आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी.
महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा
पुढे राज ठाकरे म्हणाले, असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांत तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच. पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.