आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना खासदार संजय राऊत यांनी UPA अध्यक्ष पदाबाबत काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन आता त्यांनी यूटर्न घेतला आहे. गुरुवारी एका टीव्ही इंटरव्ह्यूमध्ये राऊत म्हणाले की, सोनिया गांधींऐवजी शरद पवारांना UPA चा अध्यक्ष बनवा, असे मी कधीच म्हणालो नाही.
काही दिवसांपूर्वी संजय राऊत म्हणाले होते की, 'सोनिया गांधी अनेक वर्षांपासून UPA चे नेतृत्व करत आहेत. आज UPA खूप कमकूवत झाला आहे. अशा परिस्थितीत भाजपसमोर टीकणे अवघड आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे की, UPA चे नेतृत्व एखाद्या अनिभवी व्यक्तीकडे असावे. असे अनुभवी व्यक्ती फक्त शरद पवार आहेत.' या वक्तव्यानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या नाराजीनंतर राऊत यांनी आपल्या वक्तव्यावरुन यूटर्न घेतला.
सोनिया, राहुलबाबत डिंफेसिव्ह झाले राऊत
संजय राउत आता म्हणत आहे की, त्यांनी फक्त विरोधी पक्षांना मजबूत व्हायला हवे, असे म्हटले होते. राऊत पुढे म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर मजबूत संघटना तयार करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र यावे लागेल. यावेळी डिफेंसिव्ह होत म्हणाले की, 'मी कधीच सोनिया गांधी आणि राहुल गांधींची निंदा केली नाही. उलटपक्षी इतर पक्षांनी त्यांच्या विरोधात बोलल्यावर मी त्यांचे समर्थन केले आहे.'
अजित पवारांना टोला
संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अॅक्सीडेंटल होम मिनिस्टर म्हटले होते. याबाबत विचारल्यावर राऊत म्हणाले की, ही फक्त म्हण आहे. कोणी अपघाततही संधी साधतो. यावेळी राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टोला लगावला. काही दिवसांपूर्वी अजित पवार म्हणाले होते, आघाडी सरकारमध्ये वातावरण खराब होईल, असे वक्तव्य करू नका. यावर राऊत म्हणाले, लोक सकाळी-सकाळी शपथ घेऊन वातावरण खराब करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.