आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:सामान्य लोकांच्या शक्तीला कधीही कमी लेखू नका

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१४ व्या आठवड्यात युक्रेनच्या बुचा येथील नागरिकांच्या निर्घृण हत्येबद्दल आक्रोश व्यक्त करणाऱ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायासह भारतही सहभागी झाला आणि स्वतंत्र तपासाच्या मागणीचे समर्थन करत यूएनएससीमध्ये त्याचा तीव्र निषेध केला आहे. पाश्चिमात्य देशांनी आरोप केलाय की, रशियाने ‘जमिनीवर पळणाऱ्या सामान्य नागरिकांना गोळी मारणे, रणगाड्यांनी चिरडण्यासारखा भयंकर गुन्हा केला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले, बुचा, इरपिन आणि होस्टोमेलमध्ये काही ठिकाणांवर मृतदेहांचे ढीग असलेल्या सामूहिक कबरी आहेत. त्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेस्की यांनी त्याला नरसंहार म्हटले. टीव्हीवरील काही फोटो हृदय पिळवटून टाकणारे आहेत.

यावरून मला पूर्व आफ्रिकेच्या इरिट्रिया देशाची राजधानी असमाराची कहाणी आठवली. इरिट्रियाची लोकसंख्या भोपाळ-इंदूरच्या एकूण लोकसंख्येच्या बरोबर सुमारे ३७ लाख असेल. त्या काळात ती २१ लाख होती. या देशाने युद्धाचा त्रास बराच काळ सोसला. २४ मे १९९३ ला देश स्वतंत्र घोषित झाल्याच्या आधी ३० वर्षांपर्यंत शेजारी देश इथिओपियाशी युद्ध लढले. ज्या वेळी ते युद्ध लढत होते, तेव्हा गोरिल्लाची रॅग-टॅग सेना, ती स्वत:ला इरिट्रियन पीपल्स लिबरेशन फ्रंट (ईपीएलएफ) म्हणवून घेत होती. त्यांनी डोंगर कापून सुरुंग बनवले, शस्त्रे ठेवण्यासाठी नव्हे तर सैनिकांची मुले आणि तीन हजार बेडचे रुग्णालय बनवण्यासाठी त्यांनी तसे केले. ज्याप्रमाणे युक्रेनमध्ये शिक्षक, डॉक्टर्स, कारपेंटर, टेलरसारख्या सामान्य नागरिकांनी शस्त्र उचलले, पुरुषांसोबतच महिलादेखील युद्धात सहभागी झाल्या, त्या काळात सैनिकांचा पोशाख जीन्स कापून बनवण्यात आला. दान करण्यात आलेल्या जीन्सचा वापर करण्यात आला. तुम्ही आता असमारामध्ये गेलात तर तेथे वर्दळीच्या ठिकाणी मेटल शीटने बनलेले बाथरूम सँडलचे २० फूट आणि सुमारे २४ फूट उंच शिल्प दिसेल. याला शीडा स्क्वेअर म्हणतात. इरिट्रियन बाथरूम स्लिपर्सना ‘शीडास’ म्हणतात, यामागेदेखील एक चांगली कथा आहे.

असमारामध्ये एक बुटाची कंपनी होती. ती रफेलो बिनी नावाची व्यक्ती चालवत होती. त्यांनी हाँगकाँगवरून यंत्र मागवून ‘कोंगो’ नावाने स्वस्त पीव्हीसी सँडल बनवणे सुरू केले. जेव्हा इथिओपियन स‌ैन्याने बिनीच्या कारखान्यावर कब्जा केला, तेव्हा त्यांचे कामगार अंडरग्राउंड झाले आणि ईपीएलएफमध्ये दाखल झाले. नंतर स्फोटात नुकसान झालेल्या वाहनांचे टायर पिघळवून योद्ध्यांसाठी स्वस्त सँडल बनवू लागले. त्यांनी बनवलेले ‘शीडास’ स्वस्त होते, शिवाय ते कोणत्याही पाण्याने स्वच्छ केले जाऊ शकत होते. दुसरीकडे इथिआेपियन जाड बूट घालून जात तर ईपीएलएफ सँडल्स घालून आरामाने इकडे-तिकडे फिरत. युद्धात एखाद्या ईपीएलएफ सदस्याचा मृत्यू झाला तरी त्याच्या वस्तू सांभाळून ठेवल्या जात. बरीच वर्षे ईपीएलएफ, मृत जवानांच्या कुटुंबांना त्यांच्या सँडल्स पाठवत राहिले. त्या सँडल्स घालून ते स्वातंत्र्यासाठी लढले. त्या पुरुष किंवा महिलांच्या आठवणीत घरात सँडल्सच्या अवतीभोवती एक स्मारक बनवले जाते. त्यामुळे हे भव्य शीडास शिल्प पाहून लोकांना ३० वर्षे चाललेल्या त्या युद्धाची आठवण येते.

एन. रघुरामन

मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...