आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना रोखण्यासाठी:लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेचा नवा नियम, मुलांसोबत प्रवास करण्यास महिलांना मनाई

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेल्वे बोर्डाने केवळ महिलांना परवानगी दिली असल्याचे रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या प्रवासाविषयी नवीन नियम बनवण्यात आले आहेत. रेल्वेने म्हटले आहे की, पुढील आदेशापर्यंत महिला आपल्या मुलांसोबत लोकलने प्रवास करु शकत नाही. हा निर्णय मध्य रेल्वे (सीआर) आणि पश्चिम रेल्वे (डब्ल्यूआर) वर तातडीने अंमलात आणला गेला आहे.

रेल्वे बोर्डाचा आदेश

रेल्वे बोर्डाने केवळ महिलांना परवानगी दिली असल्याचे रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते. प्रवाशांना मुंबई महानगर क्षेत्रात निर्धारित वेळेत लोकल गाड्यांमध्ये प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

मात्र, असे दिसून आले आहे की प्रवासादरम्यान महिला प्रवासी आपल्या मुलांसह प्रवास करत असतात. या कारणास्तव, रेल्वेने पुन्हा एकदा असा उल्लेख केला आहे की निर्धारित कालावधीत फक्त महिलांनाच प्रवासाला परवानगी दिली आहे मुलांना नाही.

प्रवेशद्वारावर अधिकारी तैनात केले जातील
मुलांच्या प्रवेशास प्रतिबंधित करण्यासाठी प्रत्येक प्रवेशद्वारावर आरपीएफ नेमण्यात येईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 21 ऑक्टोबरपासून सकाळी 11 ते दुपारी 3 या दरम्यान आणि सायंकाळी 7 वाजेनंतर प्रवास करण्याची सर्व महिला प्रवाशांना परवानगी देण्यात आली होती. ट्रेनमध्ये प्रवेशाची परवानगी आवश्यक श्रेणी प्रदात्यांव्यतिरिक्त कोणत्याही क्यूआर कोडशिवाय वैध तिकिटांच्या आधारे दिली जाईल. दोन्ही रेल्वेंनी सेवांनुसार पाऊल उचलले आणि महिलांच्या विशेष गाड्यांची संख्या व वारंवारताही वाढवली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser