आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोविड-19:अति सौम्य किंवा लक्षणे नसणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी नवा नियम

मुंबई9 महिन्यांपूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • कोरोनाबाधित रुग्णास घरीच राहण्याची मुभा

अति सौम्य किंवा कोणतीही लक्षणे दिसत नसणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना आता कोविड रुग्णालयांच्या ऐवजी त्यांच्या घरीच क्वाॅरंटाइनमध्ये राहण्यास राज्य सरकाराने मुभा दिली आहे. तसा नियम राज्याचे सार्वजनिक आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी शनिवारी जारी केला आहे.

बाधित रुग्णांचे अति सौम्य, मध्यम आणि तीव्र लक्षणे असे वर्गीकरण केले जाते. अति सौम्य लक्षणे किंवा कोणतीही लक्षणेच दिसत नाहीत अशा रुग्णांना कोविड रुग्णालयांऐवजी घरी राहता येईल, असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र त्यासाठी सरकारने अनेक अटी घातल्या. अशा पाॅझिटिव्ह रुग्णांच्या घरी विलगीकरणात राहण्याची पूर्ण सोय हवी, २४ तास काळजी घेणारे असावे, रुग्णाने आरोग्य अधिकाऱ्याच्या कायम संपर्कात राहावे, रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने प्रोटोकाॅलनुसार हायड्राॅक्सीक्लोरोक्वीन गोळ्या डाॅक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्यात, अशा त्या अटी आहेत. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा रुग्णास घरी ठेवता येईल, असे वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रमाणित करणे आवश्यक आहे. कोरोनाची चाचणी केल्याच्या दिवसापासून १७ दिवस किंवा ताप येत नसल्याच्या दिवसापासून १० दिवस अशा रुग्णास घरी क्वॉरंटाइनमध्ये राहावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...