आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाला आता नाट्यमय वळण मिळाले असून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जप्त केलेल्या दस्तऐवजात मुंबई पोलिस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची नावे व त्यांना दरमहा देण्यात येणाऱ्या पैशाचा तपशील अशी यादी दिसून आली आहे. ही दरमहा ठरावीक रक्कम लाच घेणाऱ्यांची यादी असावी, असा संशय एनआयएला आहे.
निलंबित एएसआय सचिन वाझेप्रकरणी तपास कामाचा एक भाग म्हणून एनआयए पथकाने गुरुवारी गिरगाव येथील एका क्लबमध्ये धाड टाकली होती. या ठिकाणी काही दस्तऐवज हाती लागले. त्यापैकी एका फाइलमध्ये कार्यालय आणि अधिकाऱ्याचे नाव, पद लिहीले असून त्यापुढे रक्कम लिहिली आहे. त्यात प्रत्येक महिन्याला कोणत्या अधिकाऱ्याला किती रक्कम दिली त्याचा तपशील आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.