आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाथाभाऊंची नवी इनिंग:एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत हातात बांधले घड्याळ

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते अजित पवार प्रकृतीच्या कारणास्तव या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत

कालपर्यंत भाजपचे जेष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी गेल्या चाळीस वर्षांपासून भाजपसाठी कार्य केले. मात्र राजकारणात झालेल्या अन्यायामुळे ते भाजपला रामराम ठोकत आता हातावर घड्याळ बांधले आहे.

राष्ट्रवादीच्या 11 दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश होत आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते अजित पवार प्रकृतीच्या कारणास्तव या सोहळ्याला उपस्थित नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश झाला आहे. दरम्यान एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी प्रवेशासाठी गुरुवारी दुपारी विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने सहकुटुंब मुंबईला दाखल झाले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांचीही उपस्थिती आहे.

यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, मला राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याबद्दलम मी शरद पवारांचा मनापासून आभारी आहे. भारतीय जनता पक्षाने मला अडगळीत टाकले होते. मला आता नव्या संधींची अपेक्षा नव्हती. पण मला छळण्यात आले. पक्षासाठी चाळीस वर्षे संघर्ष केला. पण पक्षाने माझ्या मागे अँटी करप्शन लावले. इनकम टॅक्स लावले आहे. मी भारतीय जनता पक्षाचे काम जेवढ्या निष्ठेने केले तेवढेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कामही निष्ठेने करणार आहे. भारतीय जनता पक्ष जसा वाढवला त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढू असा विश्वास त्यांनी शरद पवारांना दिला आहे.