आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आणखी एकाला अटक:मुंबईतील पोलिस निरीक्षक सुनिल मानेला NIA कडून अटक; मनसुखच्या हत्येसह स्फोटके ठेवण्यात वाझेला मदत केल्याचा आरोप

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनसुख आणि स्फोटके प्रकरणात अटक झालेला माने तिसरा पोलिस अधिकारी

राष्ट्रीय तपास संस्था NIA ने शुक्रवारी मुंबईतील पोलिस निरीक्षक सुनिल माने याला अटक केली आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणी अटकेत असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेला मदत केली होती असे मानले जात आहे. या अटकेनंतर आज दुपारीच मानेला स्थानिक न्यायालयात हजर केले जाईल. तसेच त्याची एनआयए कोठडी मागितली जाणार आहे.

अशी झाली अटक

एंटिलिया स्फोटक प्रकरणात अटक झालेला माने मुंबई पोलिसातील तिसरा अधिकारी आहे. यापूर्वी सहाय्यक पोलिस निरीक्षक वाझेसह सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाझुद्दीन काझीला सुद्धा अटक करण्यात आली. काझीने देखील वाझेला स्फोटके ठेवण्यात मदत केली होती असा आरोप आहे. विशेष म्हणजे, काझीची न्यायालयीन कोठडी आजच संपुष्टात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काझीच्या जबाबानंतरच सुनिल मानेला अटक करण्यात आली.

तत्पूर्वी मनसुख हिरेन हत्येचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र ATS ने माजी पोलिस काँस्टेबल विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकीला अटक केली होती. सध्या शिंदे पॅरोलवर आहे. कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना देखील NIA च्या हवाली करण्यात आले होते. सध्या हे दोघेही न्यायलयीन कोठडीत आहेत.

असे आहे प्रकरण
25 फेब्रुवारी रोजी मुंबईतील पेडर रोड येथिल मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. कारमध्ये जिलेटीनच्या 20 कांड्या सापडल्या होत्या. 5 मार्च रोजी या कारचा मालक मनसुख हिरेनचा मृतदेह रेती बंदर परिसरात सापडला. यांना महाराष्ट्र ATS ने हत्येचा तपास सुरू केला आणि दोन जणांना अटक केली. त्यानंतरच तपासात एनआयएची एंट्री झाली आणि वाझेला अटक करून संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...