आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NIA ची मुंबईत धडक कारवाई:अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या सहकाऱ्याला अटक, राजकारण्यांवर हल्ला करण्याचा होता कट

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIAने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा राइट हँड मानल्या जाणाऱ्या छोटा शकीलचा मेहुणा सलीम कुरेशीच्या मुसक्या आवळल्या आहेत. एनआयएने शुक्रवारी सकाळी या कारवाईची माहिती एका ट्विटद्वारे दिली.

सलीम कुरेशी याला सलीम फ्रूट नावानेही ओळखले जाते. एनआयएने गत मे महिन्यातच दाऊद इब्राहिमच्या सहकाऱ्यांवर कारवाई करत मुंबई व ठाण्यात 20 ठिकाणी छापेमारी केली होती. यावेळी सलीम कुरेशीलाही ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या कसून चौकशीनंतर आता त्याला अटक करण्यात आली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाऊदसह छोटा शकील व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधीच्या एफआयआरनुसार, दाऊदने भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानात एक विशेष पथक तयार केले होते. या पथकावर भारतातील राजकीय नेत्यांवर हल्ला करण्याची जबाबदारी होती. एवढेच नाही तर पाकमध्ये बसून भारतात जातीय दंगली घडवण्याचाही त्यांचा डाव होता.

कोण आहे सलीम फ्रूट?

सली कुरेशी उर्फ सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा मेहुणा आहे. दक्षिण मुंबईत त्याच्या कुटुंबाचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. त्यामुळे त्याला सलीम फ्रूट म्हणूनही ओळखले जाते. दाऊदचा इब्राहिमचा जवळचा सहकारी म्हणूनही त्याची ओळख आहे. त्याने आतापर्यंत अनेकदा छोटा शकीलची पाकमध्ये जावून भेट घेतल्याचीही चर्चा आहे.

ईडीने दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अनेकदा सलीम फ्रूटची चौकशी केली. त्यात त्याने आपला दाऊदची बहिण हसिना पारकर यांच्याशी जवळचा संबंध असल्याचे मान्य केले होते.

बातम्या आणखी आहेत...