आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणारी एनआयए दररोज नवनवीन खुलासे करत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणी 10 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. मनसुख हिरेनला मारण्यासाठी एका फेसटाईम अॅपच्या माध्यमातून निर्देश देण्यात आले होते, असा आरोपात खुलासा करण्यात आला आहे.
या चार्जशीटनुसार, या फेसटाईम अॅपला सक्रिय करण्यासाठी ISE####@gmail.com या जीमेल आयडीचा वापर केला गेला होता. एनआयएने या जीमेल अकाउंटशी कोणाचा मोबाईल नंबर जोडला गेला आहे आणि त्या व्यक्तीचे नाव काय? हे जाणून घेण्यासाठी अॅलच्या एका लीगल पथकाशी संपर्क साधला. दरम्यान या पथकाने या फेसटाईम खात्याचे पहिले नाव कुरकुरे आणि शेवटचे नाव बालाजी असल्याचे एनआयएला सांगितले.
पोलिसांच्या विधानामुळे वाढला संशय
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या हाताखाली काम करणार्या एका पोलिस कर्मचार्याने सांगितले की, परमबीर सिंह यांच्या आयफोन आयडीचे पहिले नाव 'कुरकुरे' आणि शेवटचे नाव 'बालाजी' होते. कर्मचाऱ्याच्या या विधानामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेला परमबीर सिंह यांच्यावर संशय वाढत गेला. आयडी तयार करत या दोन्ही ब्रँडचे स्नॅक्स ऑफिसमध्ये होते, त्यामुळे हे नाव तयार करण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे.
तपासाला दिशाभूल करण्यासाठी सायबर तज्ञांना 5 लाख रुपये
एनआयएने यापूर्वी एका सायबर तज्ञाची चौकशी केली होती. चौकशीदरम्यान, सायबर तज्ञाने म्हटले होते की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अँटिलिया प्रकरणातील तपासाला दिशाभूल करण्यासाठी जैश-उल-हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधित अहवालाशी छेडछाड केली होती. ज्यासाठी परमबीर सिंगने 5 लाख रुपये रोख सायबर तज्ञांना दिले होते.
वाझेजवळ विना IEMI नंबरचे अनेक मोबाईल
राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणात आणखी एक खुलासा केला आहे. एनआयएने सांगितले की, सचिन वाझेजवळ विना IEMI नंबरचे दोन मोबाईल होते. IEMI असलेल्या नंबरला मोबाईल ट्रॅक करता येते. परंतु, वाझेच्या मोबाईला IEMI नंबर नसल्याने त्याला ट्रॅक करणे अवघड काम होते. हे फोन सचिन वाझेला एका व्यक्तीने विकले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.