आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटिलिया प्रकरण:रात्री सचिन वाझेला घेऊन CST स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वर पोहोचले NIA चे पथक, सीन रीक्रिएट केला

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाझेच्या वसूली रॅकेटमध्ये मोठ्या अधिकाऱ्यांचाही सहभाग

अँटिलिया प्रकरणातील आरोपी मुंबई पोलिसांनी निलंबित केलेला एपीआय सचिन वाझेला घेऊन सोमवारी रात्री उशिरा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (NIA) चे पथक मुंबईतील CST रेल्वे स्थानकात दाखल झाले. येथे NIA च्या पथकाने सीन रीक्रिएट केला. तसेच CCTV फुटेजसोबत पुरावे अधिक मजबूत करण्यासाठी वाझेला प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वर घेऊन गेले. येथे सीसीटीव्ही पुरावा क्रॉस-व्हेरिफाईड करता यावा यासाठी रेड-टॅपिंग करून सचिन वाझेला चालायला लावून सीन रिक्रिएट करण्यात आला. या वेळी फॉरेन्सिक टीमही हजर होती. संपूर्ण प्रक्रिया संपल्यानंतर पथक सचिन वाझेला गाडीत बसवून परतले.

वाझेच्या वसूली रॅकेटमध्ये मोठ्या अधिकाऱ्यांचाही सहभाग
अँटिलिया आणि मनसुख हिरेन खून प्रकरणाचा तपास करणार्‍या NIA ला बरेच नवीन पुरावे सापडले आहेत. हे पुरावे सचिन वाझेच्या वसूली रॅकेटशी संबंधित आहेत. NIA च्या म्हणण्यानुसार वसुलीच्या रॅकेटमध्ये पोलिस व प्रशासनातील काही उच्च अधिकारीही सहभागी होते. सचिन वाझेने या अधिकाऱ्यांना पैसे दिले होते आणि या देयकाची कागदपत्रे NIA ला मिळाली आहेत. गिरगावातील एका क्लबवर छापा टाकताना एनआयएच्या हाती हे पुरावे लागले.

सचिन वाझेची कोठडी 7 एप्रिलपर्यंत वाढली
सचिन वाझे याची कोठडी 7 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. विशेष कोर्टाने NIA ला सचिन वाझेला सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष कोर्टाने तपास एजन्सीला 7 एप्रिल रोजी त्याच्या पुढील हजेरीदरम्यान त्याच्या तब्येत व आजारपणाबद्दल तपशीलवार अहवाल सादर करण्यास सांगितले.

तत्पूर्वी सचिन वाझेचे वकील रौनक नाईक यांनी कोर्टाकडे अर्ज लिहिला होता. त्यात त्यांनी सांगितले की वाझेच्या छातीत वेदना आहेत. तसेच हृदयामध्ये 90% चे दोन ब्लॉकेज आहेत. अशा स्थितीत, वाझेला त्याच्या हृदयरोगतज्ज्ञांशी भेट करून दिली पाहिजे जेणेकरुन त्याचा उपचार सुरू होऊ शकेल.

बातम्या आणखी आहेत...