आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मनसुख हिरेन प्रकरणी क्राइम ब्रांचमधून उचलबांगडी केल्यानंतर आता API सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर अँटीलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेंचा ताबा मिळवलेली NIA ची टीम आता या प्रकरणाचे क्राइम सीन रीक्रिएट करणार आहे. वाझेंना अंबानींच्या घराजवळ नेऊन त्यांना चक्क PPE कीट घातला जाणार आहे. यामध्ये 5 स्वतंत्र साक्षीदारांची मदत घेतली जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओजवळ 25 फेब्रुवारी रोजी एक व्यक्ती PPE कीट घालून दिसून आली होती. हीच व्यक्ती स्कॉर्पिओचा पाठलाग करणाऱ्या इनोव्हा कारची चालक होती असेही सांगितले गेले. तोच सीन आता NIA रीक्रिएट करत आहे.
सचिन वाझे यांच्यासोबत काम करणाऱ्या क्राइम ब्रांचच्या एका अधिकाऱ्यासह एका हवालदाराची सुद्धा NIA कडून चौकशी केली जात आहे. त्यांना तपास संस्थेने सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते. त्यामध्ये API रियाज काझी यांचीही पुन्हा चौकशी केली जात आहे.
राष्ट्रीय तपास संस्था NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि त्याचा पाठलाग करणारी इनोव्हा या दोन्ही कारच्या चालकांचा पत्ता लागला आहे. दोघांचीही कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणात त्यांना अटक केली जाऊ शकते. हे दोघेही सचिन वाझे यांचे जवळिक होते असेही तपासात समोर आले आहे.
वाझेंच्या सोसायटीतील सीसीटीव्ही जप्त
NIA च्या टीमने वाझे यांच्या ठाणे येथील सोसायटीत सुद्धा काही लोकांची चौकशी केली. तसेच त्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही जप्त केले. यामध्ये 2 मार्च ते आतापर्यंत वाझे कुठे-कुठे आणि कधी जात होते याचा तपास केला जात आहे. सचिन वाझे यांचे कुटुंब सध्या या सोसायटीत नाही. वाझे यांच्या मालमत्तेचा सुद्धा तपास केला जात असून त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचे सूत्रांकडून समजते. कित्येक वर्षे नोकरीत नसतानाही त्यांच्याकडे ही मालमत्ता आली. त्यांच्या पत्नीच्या नावे सुद्धा प्रॉपर्टी आहे. यात काही राजकीय नेते सुद्धा NIA च्या रडारवर आहेत.
दरम्यान, वाझे यांनी आपल्या अटकेच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ती स्वीकारण्यात आली असली तरीही न्यायालयाने सुनावणीची नेमकी कोणती तारीख दिली हे अद्याप समोर आलेले नाही. या संपूर्ण कारवाईला महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून केंद्र सरकारची सूड बुद्धीची कारवाई असे म्हटले आहे. अर्णब गोस्वामीला वाझेंनी अटक केली होती. त्याचा ठरवून बदला घेत महाराष्ट्र पोलिसांचा अपमान केला जात आहे असे शिवसेनेने आपल्या मुखपत्रात म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.