आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकास्त्र:'भिकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर महाराष्ट्रासाठी करा', निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती होणार आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हाच मुद्दा पकडून नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. ''भिकेमध्ये मिळालेल्या आमदारकीचा उपयोग महाराष्ट्रासाठी करा'', असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे. निलेश राणेंनी आपल्या ट्विटर अकाउंटवर म्हटले की, ''उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी पनवती असले तरी स्वत:साठी नशिबवान आहेत. त्यांना सगळं बसल्या-बसल्या मिळालं. आता आमदारकीदेखील राज्यपालांनी बसल्याठिकाणी दिली. भिकेमध्ये मिळालेल्या आमदारकीचा उपयोग महाराष्ट्रासाठी करा.'' दुसऱ्या एका ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले की, ''मुख्यमंत्री पद काँग्रेस ncp मुळे, आमदारकी राज्यपालाकडून, पक्ष वडलांचा... ह्या माणसाचं स्वतःच काहीच नाही,'' अशी खोचक टीका निलेश राणेंनी केली. 

राज्यापालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाणार उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात संविधानिक संकटापासून वाचण्यासाठी गुरुवारी कॅबिनेटने मोठा निर्णय घेतला आहे. अल्पसंख्यक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले की, कोरोनामुळे सध्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची थेट राज्यपालांकडून विधान परिषदेवर नियुक्ती केली जाणार आहे.
उद्धव ठाकरेंनी 28 नोव्हेंबर, 2019 ला महाराष्ट्रच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. संविधानतील कलम 164 (4) नुसार उद्धव ठाकरेंना 6 महिन्याच्या आत राज्यतील कोणत्याही सदनाचा सदस्य होणे गरजेचे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आपले पद वाचवण्यासाठी 28 मे पूर्वी आमदार होणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...