आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितेश राणेंचा टोला:आज पण राणेंमुळे शिवसेनेत पद मिळतात! सिर्फ नाम हि काफी है...! ट्विटरवरुन शिवसेनेला लगावला टोला

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रकरण काय आहे?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यात मोठा वाद सुरु आहे. यावरुन शिवसेना कार्यकर्ते आणि राणे समर्थक आमनेसामने आले असून अनेक ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. मुंबईतील जुहू येथील राणेंच्या बंगल्याबाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन केली.

दरम्यान, पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करावा लागला. या आंदोलनात अग्रेसर असणाऱ्या मोहसीन शेखला आदित्य ठाकरे यांनी युवासेना सहसचिव पदी नियुक्ती केली. या नियुक्तीवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांनी शिवसेनेवर ट्विटरच्या माध्यमातून जोरदार टोला लगावला आहे.

काय म्हणाले नितेश राणे?
नितेश राणे यांनी या नियुक्तीवरुन शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. राणे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या ट्विटर हँडलवरुन दोन फोटो शेअर केले आहे. “राणेंच्या बंगल्यासमोर मार खाणाऱ्या 'त्या' युवासेना कार्यकर्त्याची बढती” आज पण राणेंमुळे शिवसेनेत पद मिळतात!! सिर्फ नाम हि काफी है!!! असे लिहित शिवसेनेवर जोरदार टोला लगावला आहे.

प्रकरण काय आहे?
नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील जूहू येथील राणे यांच्या बंगल्यासमोर जोरदार निदर्शन केली. दरम्यान, राणे समर्थक आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी उडाली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला. यावेळी पोलिसांनी शिवसेनेच्या मोहसीन शेख या कार्यकर्त्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली.

या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या कार्यकर्त्याला मोठं गिफ्ट दिले आहे. मोहसीन शेख या कार्यकर्त्याची युवासेनेच्या सहसचिव पदी निवड करण्यात आली. या निवडीचे एकीकडे स्वागत केले जात आहे तर दुसरीकडे राणे समर्थकांकडून टीका केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...