आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिर निर्माणावरून वाद:महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता, निलेश राणे यांचे संजय राऊतांवर टीकास्त्र

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राम मंदिर वर्गणीतून बांधायचे? हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड 2024चा निवडणूक प्रचार; शिवसेनेचा आरोप

अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजप सरकारवर निशाणा साधला. राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? असा सवाल अग्रलेखातून केला आहे. यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

...तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता

निलेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संजय राऊत यांच्या टीका केली आहे. शिवसेनेने लाज सोडली. शिवसेनेने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्य भर फक्त वापर केला. महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता. असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

ज्यांचे घर वर्गणीतून चालते तेच मंदिर वर्गणीतून बांधणार काय असे विचारत आहेत. जनाची नाही पण किमान मनाची तरी ठेवा. अशा शब्दांत निलेश राणे यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली.

बातम्या आणखी आहेत...