आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांवर टीका:'ही सरळ सरळ शिवसेना प्रमुखांची बदनामी, हे सगळं बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी निमुटपणे ऐकून घ्यायचं...' म्हणत निलेश राणें उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसारखी तुलना केल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेविषयी मत मांडले.

एकीकडे राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय तर दुसरीकडे कंगनाच्या विधानावरुन सुरू झालेला वाद अद्यापही सुरूच आहे. कंगनाने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसारखी तुलना केल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेविषयी मत मांडले. आता याच कारणावरुन निलेश राणेंनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे.

अभिनेत्री कंगना रनोटने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर मोठा वाद सुरू झाला. यानंतर अनेकांनी आपली मतं बोलण्यास सुरुवात केली. यावर बोलताना अनुराग कश्यपनेही मुंबईविषयी आपले मत व्यक्त केले होते. तो म्हणाला होता की, 'मी कुणाचीही बाजू घेत नाहीये मात्र, मला महाराष्ट्रात अगदी सुरक्षित वाटतं. मला खुलेपणाने माझी मतं व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. गेल्या काळातील अनेक घटनाक्रमामुळे माझ्या मनातील शिवसेनेची प्रतिमा बदलली आहे. त्यामागे एकमेव कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. मी उद्धव ठाकरे यांच्या मतांशी सहमत नसू शकतो, पण मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं.' असे अनुराग कश्यप म्हणाला होता.

अनुराग कश्यपने मांडलेल्या या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेबाबतची मतं बदलली? म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेबाबत अनुराग कश्यपची मतं वेगळी होती? ही सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी आहे. हे सगळं बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी निमुटपणे ऐकून घ्यायचं....' असंही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...