आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:महाराष्ट्रात मुघल सत्तेत आलेत म्हणून इथे तसे काही होईल वाटत नाही, युपी सरकारच्या निर्णयावरून निलेश राणे यांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आग्रामध्ये बांधण्यात येणाऱ्या मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव, योगी सरकारचा निर्णय
  • निलेश यांनी मराठा आरक्षणावरूनही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला

आग्रामध्ये बांधण्यात येणाऱ्या मुघल संग्रहालयाला मुघलांचे नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. भाजप नेते निलेश राणे यांनी याचाच धागा पकडत ठाकरे सरकारवर निशाणा साधत जहरी टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. यासोबतच त्यांनी मराठा आरक्षणावरूनही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले निलेश राणे?

निलेश राणे यांनी ट्विट केले की, "आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलून “छत्रपती शिवाजी महाराज” यांचं नाव देण्याचा स्तुत्य निर्णय उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने घेतला. महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून इथे तसं काही होईल वाटत नाही'' असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

निलेश यांनी मराठा आरक्षणावरूनही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला

''जवळपास 3/4 दिवस झाले तरी अजून महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षणाबद्दल काय भूमिका घेणार हे स्पष्ट करत नाहीये. आम्हाला अशोक चव्हाण यांच्या कामाचा अनुभव आहे ते कधीच कुठलेही काम वेळेत करू शकत नाही आणि पूर्णत्वास नेऊ शकत नाही. त्यावर मुख्यमंत्र्याचे काम शून्य. ह्यांना झटका द्यावाच लागेल,'' असे निलेश राणे यांनी मराठा आरक्षणावरून सरकारवर निशाणा साधताना म्हटले आहे.

दरम्यान, निलेश राणे यांनी राज्य सरकारला थेट मुघलांची सत्ता अशी उपमा दिल्याने ठाकरे सरकार या टीकेला काय प्रत्युत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.