आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Nilesh Rane FIR | Marathi News | Sindhudurg Police Filed Crime Agaisnt Bjp Leader Nilesh Rane After Argument With Police Outside Sessions Court In Sindhudurg

जमावबंदीचे उल्लंघन:न्यायालयाबाहेर पोलिसांसोबत हुज्जत घालणे नितेश राणेंना पडणार महागात; ओरोस पोलिसांनी केला गुन्हा दाखल

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर न्यायालय परिसरात निलेश राणे यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता निलेश राणे यांना पोलिसांसोबत हुज्जत घालणे महागात पडणार आहे. निलेश राणे यांच्या विरोधात आता ओरोस पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सध्या संतोष परब हल्लाप्रकरणात भाजप आमदार नितेश राणे जामिनासाठी न्यायालयात फेऱ्या मारत आहेत. काही दिवसांपूर्वीच नितेश राणे अज्ञातवासात असताना त्यांचा ठावठिकाणा माहिती असला तरी सांगणार नाही, असे विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांना थेट चौकशीची नोटीस पाठवून त्यांची कायदेशीर चौकशी केली होती.

मात्र आता पोलिसांनी निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, राणे कुटुंबीयांना आणखी एक धक्का बसला आहे. पोलिसांनी निलेश राणे आणि त्यांच्या पाच समर्थकांवर जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, निलेश राणे यांच्यावर पोलिसांशी हुज्जत घालणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे, या दोन कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा, यासाठी शिवसेना आमदार वैभव नाईक आग्रही आहेत. त्यासाठी नाईक यांनी पोलिसांना पत्र देखील पाठवले आहे.

मंगळवारी भाजप आमदार नितेश राणे यांच्या सुनावणीनंतर न्यायालयाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता. जमाव केल्याप्रकरणी आणि पोलिसांशी हुज्जत, शांततेचा भंग केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहेत. व्हिडीओ शूटिंग पाहून अन्य जणांवर ही गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त जमाव केल्याप्रकरणी आणि जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात काल रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नितेश राणेंची मुंबई उच्च न्यायालय धाव

कनिष्ठ न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज बुधवारी केसची नोंदणी होऊन प्राथमिक सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होण्याची शक्यता आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या खुनाच्या प्रयत्नातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप नितेश राणे यांच्यावर आहे. या प्रकरणी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने काल त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात सत्ताधारी राजकीय सूडबुद्धीने ही केस लढवत असल्याचे जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...