आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआदित्य ठाकरेनी जाहीर करावं मंत्री असताना दावोस दौऱ्यानंतर ते लंडनमध्ये 10 दिवस घालवले की नाही? लंडन मध्ये असताना कुठले शासकीय काम त्यांनी हातळलं? अशी बोचरी टीका भाजप नेते नीलेश राणे यांनी केली. याबाबत त्यांनी आज एक ट्विट केले आहे.
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातेत गेल्यानंतर राज्यात आरोप - प्रत्यारोप सुरू झाले. यानंतर आदित्य ठाकरेंनी एकामागून एक प्रेस घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंजही दिले होते. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांविरोधात मोहीम राबवित आहेत. कालही त्यांनी एक आरोप करून खळबळ उडवू दिली. याच आरोपाचा संदर्भ घेत आज नीलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली.
काय म्हणाले नीलेश राणे?
भाजप नेते नीलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना उद्देशून ट्विट केले. त्यात ते म्हणाले, ''आदित्य ठाकरेनी जाहीर करावं मंत्री असताना दावोस दौऱ्यानंतर त्याने लंडनमध्ये 10 दिवस घालवले की नाही? लंडन मध्ये असताना कुठले शासकीय काम त्यांनी हातळलं?''
नीलेश राणेंचे ट्विट
आदित्य ठाकरेंचे आरोप काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावर जावून आले. चार दिवसांचा खर्च पस्तीत ते चाळीस लाख एवढा झाला. विशेषतः कमर्शियल विमान असताना मुख्यमंत्री चार्टर विमानाने गेले. कदाचित लवकर जायचे असेल वेळ नसेल मान्य आहे. ते पहिल्या दिवशी सकाळी पोहचणे अपेक्षित होते पण ते चार्टर विमानाने जावूनही सायंकाळी पोहचले त्यामुळे तेथील काही नियोजित काही बैठकाही रद्द कराव्या लागल्या. अशी टीका केली. यानंतर निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.
काय म्हणाले दीपक केसरकर?
दीपक केसरकरांनी एकनाथ शिंदे दावोसमध्ये फक्त 4 तास झोपल्याचा दावा केला. दावोस दौऱ्यात हजारो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार होती, अशा वेळी मुख्यमंत्र्यांचे् दावोसमध्ये अनुपस्थित राहणे योग्य नव्हते. हा पंतप्रधान मोदींचा अपमान ठरला असता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 76 तास दावोसमध्ये होते आणि यावेळी ते केवळ 4 तास झोपले. 72 तास त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केली. महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.