आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:संज्या राऊत 99% शिवसैनिकांना खटकतो म्हणून संधी मिळेल तेव्हा ते त्याला फाट्यावर मारतात - निलेश राणे

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेनेचे लोकसभेतील खासदार संजय राऊतला किंमत देत नाही - निलेश राणे

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर विरोधकांनी दोन्ही सभागृहात सरकारला विरोध केला होता. मात्र शिवसेनेने संसदेच्या दोन्ही सभागृहात वेगवेगळी भूमिका घेतली. यावरून शिवसेनेवर टीकेची झोड उठली आहे. माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेच्या या भूमिकेवरून खासदार संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेनेच्या या भूमिकेवरून निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ''आधी CAA नंतर कृषी बिल, दोन्ही वेळेला लोकसभेत समर्थन आणि राज्यसभेत विरोध याचे कारण म्हणजे शिवसेनेचे लोकसभेतील खासदार संज्या राऊतला किंमत देत नाही व नेता मानत नाही. संज्या 99% शिवसैनिकांना खटकतो म्हणून संधी मिळेल तेव्हा ते संज्याला फाट्यावर मारतात आणि पक्षाची भूमिका मात्र बाजूला राहते'' असे ट्विट करत निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर विरोधकांनी दोन्ही सभागृहात सरकारला विरोध केला होता. मात्र सध्या भाजपशी उघडउघड संघर्ष करणाऱ्या शिवसेनेने लोकसभेत विधेयकांना पाठिंबा दिला. तर राज्यसभेत मात्र विरोधात भाषण करून शिवसेनेच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते.

बातम्या आणखी आहेत...