आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलेश राणेंची पोस्ट चर्चेत:'बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, शिष्य कॅबिनेट मंत्री पण दिघे साहेबांच्या घरुन साधा नगरसेवक, शाखाप्रमुख नाही'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, शिष्य एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक नाही, असे म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. निलेश राणेंची पोस्ट ही सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

शुक्रवारी धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर आधारित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’चित्रपट पदर्शित झाला आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट शिवसेनेकडून प्रदर्शित करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, "शिष्य" एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुख नाही पण निवडणूक आली की दिघे साहेब. आज दिघे साहेबांवर आधारित धर्मवीर नावाचा चित्रपट रिलीज झाला पण त्यांच्या कुटुंबाचे कुठेच नाव नाही, असे म्हणत हल्लाबोल केला.

दिघेंनी स्वत:चे आयुष्य शिवसेनेसाठी अर्पण केले -

आनंद दिघे याचं यांच पूर्ण नाव आनंद चिंतामणी दिघे. 27 जानेवारी 1952 मध्ये त्यांचा जन्म झाला. ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरात ते लहानाचे मोठे झाले. या परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या. तेव्हा बाळासाहेबांच्या प्रत्येक सभेला दिघेंची हजेरी असायची. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांकडे ते आकर्षित झाले. दिघेंनी स्वत:चे आयुष्य शिवसेनेसाठी अर्पण केले होते. त्यांनी कुटुंबियांनाही लांब केले. जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी आल्यानंतर दिघेंनी कार्यालयात राहणे सुरू केले.

इतकंच नाही तर देवाधर्माबद्दल ते सजग होते. दिघेंनीच टेंभी नाक्यावर सर्वप्रथम नवरात्र उत्सव,पहिली दहीहंडी सुरू केली होती. त्यामुळं त्यांना 'धर्मवीर' म्हटले जाऊ लागले.आनंद दिघेंची लोकप्रियता जनसामान्यांमध्ये इतकी वाढली होती की, त्यांना ठाण्याचे बाळसाहेब ठाकरे, असंही म्हटले गेले. दिघे यांचा 25 ऑगस्ट रोजी पहाटे वंदना टॉकिजजवळ अपघात झाला. त्यांना तत्काळ सिंघानिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु 26 ऑगस्ट 2001 रोजी संध्याकाळी त्यांची प्रकृती बिघडली आणि संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.