आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराणे कुटुंबीय आणि दिपक केसरकरांमधील वाद येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी या वादात उडी घेतली आहे. दिपक केसरकरांना ट्विट करुन थेट ड्रायव्हर पदाची ऑफरच त्यांनी देऊन टाकली आहे. नोकरी मागायची आहे तर नीट मागा, 1 तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे. असे म्हणत केसरकरांना नारायण राणेंवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे एकीकडे भाजप आणि शिंदे गटाचे सरकार असले तरी राणे-केसरकरांमधील वाद विरोधकांना चांगलीच संधी मिळवून देत आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच त्यांच्या मुलांबाबत मी कोणतेही वक्तव्य केले की, ते आमच्या पूर्वीच्या वादाशी जोडले जाते. नकळत वक्तव्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मी आता यापुढे पत्रकार परिषदेत कधीही राणेंचे नाव घेणार नाही, अशी भूमिका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली. भाजप व शिंदे गटात वाद होईल, असे कोणतेही वक्तव्य करणे, यापुढे टाळणार असल्याचेही केसरकर म्हणाले. मात्र राणेंनी थेट ड्रायव्हरची नोकरी देतो असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे. केसरकरांकडून राणेंना आता कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
काय म्हणाले निलेश राणे?
केंद्रिय मंत्री तसेच भाजप नेते नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी ट्विट करत केसरकर यांच्या राणेंबद्दल केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले, 'दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, 1 तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे'. मात्र नितेश राणे यांनी केसरकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. हिंदुत्वासाठी केसरकरांवर टीका न करण्याची भूमिका नितेश राणेंनी घेतली होती.
काय म्हणाले होते केसरकर?
सुशांत सिंग प्रकरणारत नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंची बदनामी केली, असा आरोप 2 दिवसांपूर्वी दीपक केसरकर यांनी केला होता. आदित्य ठाकरेंची राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. असा आरोप केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंची चर्चा सुरू होती, यातुन कुटुंबप्रमुख कसा असावा हे पंतप्रधानानी दाखवून दिले होते. असेही केसरकर म्हणाले.
केसरकर पुन्हा बॅकफुटवर
नारायण राणेंवर केलेल्या थेट आरोपांनंतर दिपक केसरकरांनी 2 दिवसातच नरमाईची भूमिका घेतली. दुसऱ्याच दिवशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, शिवसेनेतील फूट महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी स्थापन केलेली संघटना आहे. ती टीकायला हवी. तसेच, राणेंशी आदरपूर्वक वागलो आहे. त्यांच्यासोबत आता कुठलाही वाद नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.