आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राणेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान:एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि...; बेडकाच्या पिलांशी तुलना केल्यानंतर निलेश राणेंचे उद्धव ठाकरेंना खुले आव्हान

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलींवर अत्याचार करणारा श्रावणबाळ जन्माला घातला का? : नितेश राणे

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात भाजप नेते नारायण राणे आणि त्यांच्या मुलांवर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर भाजपचे नेते नारायण राणे यांच्या दोन्ही पुत्रांनी खरपूस समाचार घेतला आहे. नारायण राणे यांची बेडकाशी तर त्यांच्या दोन्ही पुत्रांची बेडकाच्या पिलांशी तुलना केल्यानंतर आता निलेश राणे हे आक्रमक झाले असून त्यांनीथेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करून म्हटले की, नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केले. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल 1 वाक्य, पण बिहारवर 20 मिनिटे ते बोलले. उद्धव ठाकरे हे धमकी कोणाला देतायेत, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा… तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो, अशा शब्दांत खोटक टीका करत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.

तर यांनी श्रावणबाळ जन्माला घातला का?

'दुसऱ्यांची पिल्लं वाईट. मग यांनी दिनोच्या खुशीत नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा 'श्रावणबाळ' जन्माला घातला आहे का? असा सवाल नितेश राणे यांनी केला. इतकी खुमखुमी आहे तर मग दिशा सालियन केस मुंबई पोलिसांवर कुठला ही दबाव न टाकता निःपक्षपाती चौकशी करु दया. मग श्रावणबाळ काय दिवे लावतो ते कळेल, असे म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

बातम्या आणखी आहेत...