आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माँसाहेबांच्या मृत्यवूर नीलेश राणेंचे प्रश्नचिन्ह:कर्जतच्या फार्म हाऊसवर नेमके काय झाले, महाराष्ट्राला कळावे; दोन खळबळजनक ट्विट

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी खासदार, भाजपचे प्रदेश सचिव आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांचे दोन ट्विट करून माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

गेली अनेक वर्षे राणे आणि ठाकरे कुटुंबीयांमधील वाद महाराष्ट्रातील जनतेला सर्वश्रूत आहे. आता या ट्विटमुळे त्यात भर पडणार आहे. हे नक्की.

नीलेश राणे काय म्हणाले?

नीलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ठाकरे घरातल्या एका सुंदर व्यक्तीमुळे चव्हाण आडनावाच्या एका व्यक्तीचा मर्डर करण्यात आला का?? स्वर्गीय मीनासाहेब (मा.साहेब) ठाकरे ज्या दिवशी गेल्या, त्या कशा गेल्या, कुठल्या परिस्थितीत गेल्या, कर्जतच्या फार्म हाऊस वर काय झाले, हे देखील महाराष्ट्राला एकदा कळाले पाहिजे.

विनायक राऊत हिंमत असेल, तर सांग कलानगरच्या सम्राटाने घरातलीच कोंबडी कशी चोरली?? सुनेला कोंबडी समजणारा पहिला सम्राट, कोंबडी कोण माहीत नसेल तर सोनुला विचार, असा सवालही त्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंना इशारा

ट्विटनंतर नीलेश राणेंनी पत्रकारांशी संवाद साधत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी राणेंच्या नादाला तर लागायचेच नाही, हे लक्षात ठेवा. आमच्यावर भुंकणाऱ्या कुत्र्याना आवरा, नाही तर सभा घेऊन फाडेल, असा आणखी एक इशारा त्यांनी यावेळी दिला.

बातम्या आणखी आहेत...