आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याच्या राजकारणाचा दर्जा खालावत असतानाच आता गावपातळीवरील राजकारणातूनही एकमेकांना पाण्यात पाहिले जात आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कडोळी गावात खोट्या तक्रारींना कंटाळून ११ पैकी ९ ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचाकडे राजीनामा सोपवला आहे. विशेष म्हणजे खोट्या तक्रारी ला कंटाळून सदस्यांनी राजीनामा देण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे.
सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे ११ सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे. मागील वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत ११ पैकी दहा सदस्य एका गटाचे तर एक सदस्य विरोधी गटाचा विजयी झाला. ग्रामपंचायत एकाच गटाच्या ताब्यात असल्यामुळे गावात विकास कामे होतील अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली होती.
त्यातच विरोधी गटाने सरपंच सुजाता गुडदे यांच्या जात वैधता प्रमाणपत्र वर आक्षेप नोंदवला होता. सदर प्रकरण जात पडताळणी समितीकडे चालले. मात्र रहिवासी पुरावा नसल्याचे कारण दाखवत त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याचा आरोप सदस्यांनी केला.
यासोबतच ग्रामपंचायतचे वृद्ध वारंवार खोट्या व बनावटी तक्रारी राजकीय द्वेषापोटी केले जात असल्याचा आरोपही सदस्यांनी केला आहे. या तक्रारींची चौकशी मध्येच ग्रामपंचायत वेळ जात असून विकास कामे ठप्प होऊ लागली आहेत.
या प्रकाराला कंटाळून नऊ सदस्यांनी राजीनामा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी सरपंच सुजाता गुडदे यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र दिले आहे. राजीनामा दिलेल्या सदस्यांमध्ये उपसरपंच मुक्ताबाई सुर्यवाड, ग्रामपंचायत सदस्य अरविंद भाकरे, महिंद्र इंगोले, गजानन हमाने, विजयमला कांबळे, अनिता भाकरे, चंद्रभागा इंगळे, नंदाबाई माहुरकर, सुरेखा पाईकराव यांचा समावेश आहे.
दरम्यान कडोळी हे गाव भारतरत्न नानाजी देशमुख यांचे गाव आहे. तर ग्रामपंचायत विरुद्ध राजकीय द्वेषापोटी तक्रारी केल्या जात असल्याचा आरोप करून मोठ्या संख्येने ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा देण्याची हिंगोली जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे.
विकासकामांना संधी मिळेना : अरविंद भाकरे
गावकऱ्यांनी आमच्या गटातील ११ पैकी १० सदस्यांना विजयी केले. त्यामुळे गावकऱ्यांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला देखील गावाचा विकास करण्याची संधी मिळाली. मात्र विरोधक राजकीय द्वेषापोटी वेळोवेळी तक्रारी करत आहेत. त्यामुळे चौकशा मध्येच वेळ वाया जाऊ लागला आहे. या प्रकाराला कंटाळून आम्ही राजीनामे दिले आहेत.
कडोळी भारतरत्नाचे गाव
भारतरत्न नानाजी देशमुख समाजसेवेसाठी त्यांना 2019 ला भारतरत्न या सन्मानाने गौरविण्यात आले. अख्खी हयात समाजसेवेसाठी नानाजी देशमुख यांनी खर्च केली. त्यांना लोकमान्य टिळकांची प्रेरणा मिळाली होती. भारतीय जनसंघाचे ते महासचिवही होते. भारतरत्नाच्या या गावात ग्रामपंचायतीत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.