आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:निर्भयाची आई म्हणते, सध्याचे वकील बदला; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना लिहिले पत्र

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साकीनाका भागातील खैरानी रोडवर घडलेल्या निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून राज्य सरकारने नेमेलेले अॅड. राजा ठाकरे यांना बदलण्यात यावे, अशी मागणी निर्भयाच्या आईने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांना बुधवारी पत्र पाठवून केली आहे.

नऊ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्री निर्भयावर मोहन चौहान याने क्रूर अत्याचार केले होते. निर्भयाच्या मृत्युनंतर या गुन्ह्याची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली. या प्रकरणी भादंवि कलम ५०९, ३०२, ३७६ तसेच ३७७ अन्वये गुन्हा नोंदवला. मात्र निर्भया विशेष समाजाची असल्याचे समजल्यावर सदर गुन्ह्यात अनुसूचित जाती -जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ तसेच सुधारणा कायदा २०१५ नुसार गुन्हा नोंेद करण्यात आला. तसेच सदर खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि पोलिसांना पुरावे जमा करण्यात मदत व्हावी यासाठी घाईघाईन अॅड. राजा ठाकरे यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली.

सरकारी वकिलाच्या नियुक्तीवर निर्भयाच्या आईने आक्षेप घेतला आहे. अॅड. ठाकरे यांच्या जागी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक संदर्भातले खटले चालवण्याचा अनुभव असणारे वकील अॅड. नितीन सातपुते यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी निर्भयाच्या आपल्या पत्रात केली आहे. जे. जे. रुग्णालयाच्या ५ वर्षापूर्वी डाॅ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी अॅड. राजा ठाकरे यांनी काम पाहिले होते. ठाकरे यांच्या हलगर्जीपणामुळे तडवी यांच्या गुन्ह्यातील आरोपी डाॅक्टरांना जामिना मिळाला होता , असा आरोप केला आहे.

बातम्या आणखी आहेत...