आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्फोसिसवर भडकल्या अर्थमंत्री:सरकारच्या नवीन वेबसाइटमध्ये त्रुटी, तक्रारी; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी थेट इन्फोसिसच्या सहसंस्थापकांची घेतली शाळा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोबाइल अॅप 18 जूनपासून सुरू होईल

प्राप्तिकर विभागाने सोमवारी रात्री उशिरा नवीन आयकर ई-फाइलिंग पोर्टल सुरू केले. नवीन वेबसाइट पूर्वीपेक्षा चांगली बनवली गेली असा दावा केला जात होता, परंतु काही तासांनंतर नवीन वेबसाइटमध्ये त्रुटी आल्याच्या तक्रारी आल्या. या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांची शाळा घेतली. इन्फोसिसला नवीन पोर्टल विकसित करणे आणि देखभाल करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

इन्फोसिसच्या सहसंस्थापकांना फटकारले
निर्मला यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, विभागाचे ई-फाइलिंग पोर्टल 2.0 ची प्रदीर्घ काळापासून प्रतिक्षा होती. सोमवारी रात्री 10.45 वाजता त्याचे लोकार्पण करण्यात आले. बरेच लोक याबद्दल तक्रारी करत आहेत. साइट उघडण्यास अडचणी येत आहेत. नंदन निलेकणी यांना टॅग करीत त्यांनी असे लिहिले की करदात्यांनी सेवेची गुणवत्ता कमी होऊ देऊ नये. टॅक्सपेयर्ससाठी प्रक्रिया सुलभ करणे ही आपली प्राथमिकता असायला हवी.

मोबाइल अॅप 18 जूनपासून सुरू होईल
नवीन वेबसाइट 7 जूनपासून सुरू झाली आहे, परंतु कर भरणा प्रणाली 18 जूनपासून प्रगत कर हप्त्याच्या तारखेनंतर सुरू केली जाईल. याशिवाय प्रथमच देण्यात येत असलेल्या मोबाइल अ‍ॅपची सुविधाही 18 जूनपासून सुरू केली जाईल. याद्वारे करदात्यांना अ‍ॅपवरही कर संबंधित कामे करता येतील.

नवीन वेबसाइटवर दावे

  • नवीन वेबसाइच जास्त यूजर फ्रेंडली आहे. यामुळे इनक टॅक्स रिटर्न (ITR) फाइल करण्यास सोपे जाईल आणि रिफंडही लवकर मिळेल.
  • सर्व व्यवहार, अपलोड आणि प्रलंबित क्रिया एकाच डॅशबोर्डवर दिसतात जेणेकरुन यूजर त्याचा रिव्ह्यू करु शकतील आणि गरजेनुसार अॅक्शन घेऊ शकतील.
  • म्हणजेच यातून ITR फाइल करावे लागेल, त्याला रिव्हू करणे आणि अॅक्शन घेणे सोपे होईल.
  • ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्हीही परिस्थितींसाठी ITR साठी तयारी करण्याचे सॉफ्टवेअर मोफत उपलब्ध आहे. यामध्ये करदात्यांना असिस्ट करण्याची सुविधाही आहे आणि प्री-फाइलिंगचा पर्यायही आहे, जेणेकरुन कमीत कमी डेटा एंट्री करावी लागेल.
  • नवीन पोर्टलमध्ये एक नवीन टॅक्स पेमेंट सिस्टम आणण्यात आली आहे, ज्यामध्ये नेट बँकिंग, यूपीआय, आरटीजीएस, एनईएफटी इत्यादीसारखे अनेक पेमेंट पर्याय असतील.
  • करदात्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक चॅटबॉट उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

नवीन ई-फायलिंग लिंक - - www.incometax.gov.in ने उपलब्ध हायपरलिंक "http://existing www.incometaxindiaefiling.gov.in" ची जागा घेतली आहे. नवीन पोर्टल ITR च्या तत्काल प्रोसेसिंगवर काम करते, ज्यामुळे टॅक्सपेयर्सचा वेगाने रिफंड जनरेट होईल.

बातम्या आणखी आहेत...