आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

निसर्ग चक्रीवादळ नुकसान :मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली ही मदत अत्यंत तोकडी- देवेंद्र फडणवीस

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात आलेल्या 'निसर्ग' चक्रीवादळाने कोकणसह महाराष्ट्राच्या काही भागात थैमान घातले. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा करुन रायगडसाठी 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. पण, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी सोशल मीडियाद्वारे आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गेल्यावर्षी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये महापुराचे संकंट आल्यावर भाजप सरकारने कशाप्रकारची आर्थिक मदत केली याची आठवण करुन दिली. तसेच, त्यांनी एनडीआरएफच्या स्टँडिग ऑर्डरचादेखील दाखला दिला. यादरम्यान फडणवीस म्हणाले की, 'निसर्ग चक्रीवादळाने कोकणात मोठे नुकसान झाले आहे. तसेच, पुणे जिल्हा, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील काही भागात मोठे नुकसान झाल्याची चित्र आहे. पीक, फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी रायगडला जाऊन 100 कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. नुकसान मोठे असल्यामुळे योग्य मदत करणे गरजेचे आहे.'

'मागच्यावर्षी सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे पूर आला होता, त्याचवेळी कोकण आणि नाशिकमध्ये देखील त्याचप्रकारचे नुकसान झाले होते. त्यावेळी आम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. कारण साधारणपणे असे संकंट आल्यावर एनडीआरएफच्या रेटनुसार आपण मदत देतो. तेवढेच पैसे केंद्र सरकारकडून मिळतात. ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात नुकसान होते, त्यावेळेस स्टॅडिंग ऑर्डरमध्ये जी नुकसान भरपाई होते ही नुकसान भरपाई कमी असते. त्यामुळे अशा परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय काढून एनडीआरएफपेक्षा जास्त मदत देण्यासंदर्भाचा निर्णय भाजप सरकारने घेतला होता.'

'त्यावेळेस भाजप सरकारने कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांकरता 4 हजार 708 कोटींचे आणि कोकण आणि नाशिक करता 2 हजार 105 कोटींचे पॅकेज दिले होते. आमची अपेक्षा आहे की, तसेच निर्णय या संकंट काळात राज्य सरकारने घ्यायला हवे. दुकाने, टपरी, हातगाडी, हस्तकला, कारागीर, बारा बलुतेदार, छोटे गॅरेज, छोट उद्योगधंदे यावर ज्यांची उपजिविका आहे, त्यांची उपजिविका नष्ट झाली असेल तर त्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीच्या 75 टक्के किंवा 50 हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता.'

'या मदतीचे दोन भाग केले होते. एनडीआरएफच्या नियमांमध्ये बसेल ते एसडीआरएफमधून पैसे खर्च करायचे आणि केंद्राकडून ते परत मागायचे. याशिवाय नियमांच्या बाहेर जावून जी मदत आपण करतोय ते राज्याच्या निधीतून पैसे द्यायचे, अशा प्रकारे मदत केली होती. राज्य सरकारने आतादेखील अशाच प्रकारे निर्णय घ्यावे, अशी मागणी यावेळी फडणवीसांनी केली.

0